Lesbian Marriage | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

राजस्थान राज्यातील जैसलमेर (Jaisalmer) येथे पार पडलेल्या एका विवाहसोहळ्याची भारतभर चर्चा आहे. या विवाहातील वर आणि वधू मुलीच आहे. थोडक्यात सांगायचे तर हा समलैंगिक (Same-Sex Marriage) म्हणजेच लेस्बियन विवाह (Lesbian Marriage) सोहळा होता. जैसलमेर येथील एका हॉटेलमध्ये रविवारी (3 नोव्हेंबर 2019) हा विवाह मोठ्या थाटात पार पडला. विशेष म्हणजे यातील एक तरुणीही फ्रांन्स (France) देशातील तर दुसरी दक्षिण भारतीय (South India) आहे. या दोन्ह नववधूंनी एकमेकींसोबत आयुष्यभरासाठी आणाभाका घेतल्या. या विवाहाच्या वृत्ताला पुष्टी मिळाली मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.

समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायद्यास (अनुच्छेद) 377 भारतात मान्यता मिळाली. या कायद्यानुसार देशात आणि राजस्थानातील पहिला समलैंगिक विवाह रविवारी पार पडला. हा विवाह समारंभ अत्यंत गोपनीय ठेवला होता. त्यामुळे या विवाहास मर्यादीत लोकांनाच निमंत्रण होते. प्राप्त माहितीनुसार हा विवाह सोहळा तीन दिवस पार पडत होता. त्यासाठी जैसलमेर येथील दोन हॉटेल आरक्षीत करण्यात आली होती. शनिवारी महिला संगीत पार पडले आणि रविवारी थेट विवाहसोहळाच संपन्न झाला. दोन्ही तरुणींनी सात फेरे घेत वैवाहिक आयुष्यात पदार्पण केले. या विवाहानिमिंत्त आयोजित भोजन कार्यक्रमास सुमारे 100 लोक उपस्थित होते.

Same-Sex Marriage | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

प्राप्त माहिती अशी की, दोन्ही तरुणींमध्ये गेल्या काही काळापासून मैत्रीपूर्ण संबंध होते. मैत्रीतील सहवास अनुभवल्यानंतर दोघींनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. सांगितले जाते की, दोन्ही तरुणींच्या कुटुंबीयांकडून या विवाहास मान्यता नव्हती. मात्र, मोठ्या प्रयत्नांनी दोन्ही तरुणींनी आपल्या कुटुंबीयांकडून मान्यता मिळवली. हा विवाह हिंदू रीति रिवाजानुसार पार पडला. (हेही वाचा, समलैंगिक जोडी पहिल्यांदाच मुंबईत लग्नबेडीत अडकली)

Lesbian Marriage | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

सूवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या जैसलमेर येथे गेल्या काही वर्षांपासून अनेक विदेशी जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. मात्र, समलिंगी विवाहाची ही पहिलीच वेळ आहे. अवघ्या राजस्थानभर हा विवाह चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला आहे. राजस्थानला जगभरातील अनेक पर्यटक नेहमीच भेट देत असतात. या पर्यटकांपैकी काहींनी या विवाहाल हजेरी लावल्याचेही समजते.