Vedic Paint: ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी खादी बाजारात आणणार 'वैदिक पेंट'; जाणून घ्या काय असतील गावाला, शेतकर्‍यांना फायदे
Vedic Paint | Photo Credits: Twitter/ Nitin Gadkari

भारत सरकारकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आता गायीच्या गोबरपासून बनवलेल्या 'वेदिक पेंट'(Vedic Paint) चा देखील समावेश होणार आहे. खादी कडून लवकरच तो बाजारात आणला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. दरम्यान हा निर्णय ग्रामीण अर्थवस्थेला सक्षम करण्यासाठी घेतल्याचं त्यांनी सांगितले आहे. गोमूत्र, गायीचे शेण विक्रीस केंद्र सरकार देणार प्रोत्साहन, 60% निधी देऊन करु शकते स्टार्टअप.

नितीन गडकरी यांच्या ट्वीटनुसार, 'ग्रामीण इकोनॉमी ला बळ मिळण्यसाठी आणि शेतकर्‍यांना उत्पन्नाचं एक अधिकच साधन म्हणून खादी अ‍ॅन्ड विलेज इंडस्ट्री कमिशनच्या माध्यमातून लवकराच 'वेदिक पेंट' बाजारात उपलब्ध केले जाईल.' असे सांगितले आहे.

नितीन गडकरी यांचं ट्वीट

वेदिक पेंट हे डिस्टेंपर आणी इमल्शन मध्ये येणार आहे. हे इको फ्रेंडली पेंट असेल. सोबतच नॉन टॉक्सिक, अ‍ॅन्टी बॅक्टेरिअल, अ‍ॅन्टी फंगल आणि वॉशेबल आहे. केवळ 4 तासामध्ये ते सुकणार आहे. यामुळे पशूधन ठेवणार्‍या शेतकर्‍यांना वर्षाला 55 हजार रूपयांचं अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळू शकतं.

मागील काही वर्षांमध्ये देशात खादीच्या उत्पादनाची विक्री सुधारली आहे. ‘वोकल फॉर लोकल’चा नारा पंतप्रधानांनी दिल्यापासून सर्वत्र 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तू विकत घेण्याकडेही अनेकांचा कल वाढला आहे. याचा फायदा अनेक ग्रामीण, लहान उद्योजकांना होत आहे. एमएसएमईनेदेखील विक्रीमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं आहे.