गोमूत्र, गायीचे शेण विक्रीस केंद्र सरकार देणार प्रोत्साहन, 60% निधी देऊन करु शकते स्टार्टअप
Cow Dung, Cow Urine | (Photo Credits: PixaBay)

गोमूत्र (Cow Urine) आणि गायीचे शेण (Cow Dung) आदींच्या व्यवसायीकरणावर काम करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) तयारी करत आहे. या कंपन्यांना आपला व्यवसाय सुरु (Startups) करण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी आवश्यक भंडवलासाठी केंद्र सरकार साधारण 60% इतकी आर्थिक मदत करु शकते. या विषयावर काम काम करण्यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोग काही महिन्यांपूर्वीच नेमण्यात आला होता. या आयोगाचे प्रमुख वल्लभ कथीरिया यांनी ही माहिती दिली.

इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय कामधेनू आयोग चेअरमन वल्लभ कथीरिया यांनी सांगितले की, 'आम्ही गाईंवर आधारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देऊ. केवळ गायीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थच नव्हे तर, गोमूत्र आणि शेण आदी गोष्टींपासूनही उत्पन्न मिळवे. तसेच, यातून औषधे आणि कृषी क्षेत्रासाठीही याचा वापर व्हावा यासाठी आम्ही हे प्रोत्साहन देत आहोत.'

पुढे बोलताना वल्लभ कथीरिया यांनी सांगितले, शिक्षण क्षेत्रातील जाणकार आणि गुजरात येथील गांधीनगर स्थित उद्योजकता विकास संस्था (Entrepreneurship Development Institute) यांच्याशी संवाद साधून रणनिती बनवत आहोत. जेणेकरुन युवक आणि नागरिकांना गाईशी संबंधीत बिजनेस मॉडेल उपलब्ध होईल आणि त्याचा लाभही होईल. एनडीए प्रणीत भाजप सरकार नव्याने केंद्रात सत्तेवर आल्यावर फेब्रुवारी 2019 मध्ये कामधेनू आयोगाची स्थापना करण्यात आली होती. यासाठी सुरुवातीच्या काळात 500 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्याचे ठरले आहे. (हेही वाचा, भयंकर! तीन महिन्याच्या गर्भवती गाईवर बलात्कार)

कथीरिया यांनी सांगितले की, काही लोक गायींनी दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना सोडून देतात त्या लोकांची मानसिकता बदलण्यासाठी शेण आणि गोमूत्र यांच्या व्यावसायिकर महत्त्वपूर्ण ठरेन. कथीरिया यांनी पुढे म्हटले की, ते शेण आणि मूत्र यांच्या औषधी गुणधर्मांवरील संषधानासाठी वैद्यकीय संशोधनावरही आयोग भर देईन. त्यासाठी तज्ज्ञ संशोधकांना पाचारण केले जाईल. तसेच, गोशाळा चालवणाऱ्या लोकांसाठी एक प्रशिक्षण उपक्रम आणि कैशल विकास कँम्पही सुरु केला जाणार आहे.