भयंकर! तीन महिन्याच्या गर्भवती गाईसोबत बलात्कार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) गोदावरी जिल्ह्यातील तीन महिन्याच्या गर्भवती गाईसोबत बलात्कार केल्याची विचित्र घटना घडली आहे. या प्रकरणी गोकिवाडा गावातील अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू नावाचा एक इसम गोकिवाडा आणि बी कोथरु येथे गोशाळा चालवतो. गोशाळेमध्ये तीन गाईंची आणि बैलांची देखरेख केली जाते. त्यातील एक तीन महिन्याची गर्भवती गाय हरविल्याने राजूने तिची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गर्भवती असलेली गाय एका झाडाला बांधलेली भेटली असून तिच्या गुप्त भागातून रक्त येत असल्याचे दिसल्याने त्याला धक्का बसला. या प्रकरणी गाईला पशुचिकित्सकांकडे तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी गाईवर बलात्कार झाल्याचे धक्कादायक घटनेचा खुलासा केला.

या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीसुद्धा गाईंवर बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले आहे.