केरळच्या (Kerala) अलुवामध्ये 28 वर्षीय तरुणानं इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडियावर स्वत:ला श्रद्धांजली अर्पण करत आत्महत्या केली. तरुणानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शोकसंदेश लिहिला होता. अजमल शेरिफ असं तरुणाचं नाव आहे. अजमलचा मृतदेह त्याच्या घरातील खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला. चांगली नोकरी मिळत नसल्यानं अजमल तणावाखाली होता अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अजमलचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर तो कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. इन्स्टाग्रामवर (Instagram) अजमलचे 14 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.  (हेही वाचा - Karnataka Suicide: केरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, पुढील तपास सुरुकेरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, आत्महत्येचा संशय, तपास सुरु)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajmal Shereef (@ajmal_shereef)

अजमलनं इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट केला होता. त्याखाली RIP अजमल शेरीफ 1995-2023 असं लिहिलं होतं. अजमलने  आपल्या पोस्टमध्ये लिहले होते की 'अजमल शरीफचं निधन झाल्याचं कळवताना दु:ख होत आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो,' ही पोस्ट 18 हजारांहून अधिक जणांनी लाईक केली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अशा गोष्टी घडायला नकोत, या पिढीला काय झालंय, अशा आशयाच्या कमेंट्स पोस्टखाली वाचायला मिळत आहेत.