Doctors | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

रुग्णाला स्पर्श न करता डॉक्टरांना उपचार कसे करता येतील? (Doctors Cannot Treat Without Touching Patient असा सवाल आता न्यायालयानेच उपस्थित केला आहे. उपचार करताना एका महिला रुग्णाच्या शरीराला स्पर्ष केल्याबद्दल महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरला मारहाण केली. यावरुन दाखल एका प्रकरणात न्यायालयाने हा सवाल उपस्थित केला. या प्रकरणात मारहाणीचा आरोप असलेल्या आरोपीचा अंतरीम जामीन केरळ न्यायालयाने फेटाळून लावला आहे. केरळ उच्च न्यायालयाच्या (Kerala High Court) एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती बदरुद्दीन यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

आरपीच्या महिलेनेही डॉक्टरविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन डॉक्टरवर मानहानीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने डॉक्टरला मारहाण केल्यानंत महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, डॉक्टरने तक्रारदाराला स्पर्ष केला. ज्यामुळे तक्रारदाराच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण झाली. यावर डॉक्टरांच्या वकीलाने न्यायालयात बाजू मांडताना म्हटले की, डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण आगोदरच वाढले आहेत. त्यातच या प्रकरणातील आरोपीला जामीन दिल्यास समाजात भयंकर प्रवृत्ती निर्माण होतील. (हेही वाचा, संमतीने Sex केल्यावर प्रेयसीला धोका देणे हा गुन्हा नाही: उच्च न्यायालय)

ट्विट

दरम्यान, रुग्णाच्या शरीराला स्पर्ष केल्याशिवाय डॉक्टरला रुग्णावर उपचार कसे करता येतील? असा सवाल उपस्थित करत न्यायलयाने सर्व बाजू तपासून आरोपींचा जामीन फेटाळला. यावेळी न्यायालयाने डॉक्टर जेव्हा रुग्णावर उपचार करतात तेव्हा त्यांनी घेतलेल्या शपथेनुसारच उपचार करत असल्याचे म्हटले आहे. याच वेळी न्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की, काही घटना अशा घडू शकतात. डॉक्टर त्यांच्या मर्यादेबाहेर जाऊन वर्तन करु शकतात. अशा वेळी डॉक्टरांनी त्यांची मर्यादा ओलांडून केलेल्या गैरवर्तनाच्या वास्तविक प्रकरणांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. पण प्रत्येक वेळी डॉक्टर वाईट हेतूनचे स्पर्ष करतील असेही नाही. तसेच, स्पर्ष न करता डॉक्टरांना उपचारही करता येणार नसल्याने म्हटले आहे.