Representational Image (Photo Credits: File Image)

केरळ पोलिसांनी अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार (Kerala Abuse Case) केल्याच्या आरोपाखाली सरकारी बालगृहाच्या (Child Welfare) तीन काळजीवाहू कामगारांना अटक केली आहे. अजिता, माहेश्वरी आणि सिंधू या आरोपींवर लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बाल न्याय (Juvenile Justice Act) कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. बालगृहात (Children’s Home Abuse) असलेल्या चिमुकलीने केवळ अंथरुन ओले केले, म्हणून तिला शिक्षा देण्याच्या नावाखाली आरोपींनी तिच्यासोबत अमानुष वर्तन केले. तिच्यासोबत घडलेल्या वर्तनामुळे पीडितेच्या गुंप्तांगास जखमा झाल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले. हे प्रकरण पुढे आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली आहे.

अंथरूण ओले केल्याबद्दल शिक्षा

केरळमधील धक्कादायक प्रकरणात, वैद्यकीय तपासणीत बाळाच्या गुप्तांगांवर जखमा आढळून आल्यानंतर गैरवर्तनाची कथित घटना उघडकीस आली. पीडितेच्या अंगांवर शारीरिक शोषण दर्शविणाऱ्या नखांच्या खुणा देखील आढळून आल्या. संशयीत आरोपींनी पीडितेने अंथरूण ओले केल्याबद्दल शिक्षा म्हणून या जखमा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. पीडितेसोबत पाठिमागील एक आठवड्यापूर्वीच हा प्रकार घडला असावा. मात्र, तिला त्रास असहय्य होऊ लागल्याने कराव्या लागलेल्या वैद्यकीय चाचणीदरम्यान ही घटना उशीरा पुढे आली. आई वडिलांचा मृत्यू झाल्याने पीडिता आपल्या मोठ्या बहिणीसह बालगृहात राहात आहे. (हेही वाचा, Mumbai: सूरतमधील व्यक्ती 14 वर्षांच्या मुलीसोबत मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली; पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)

बालगृहातील कर्मचारी बडतर्फ

बाल कल्याण समितीचे सरचिटणीस अरुण गोपी यांनी या घटनेनंतर पुष्टी केली की, हा प्रकार पुढे येताच सबंध आठवड्यात कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या पॉक्सो कायद्यातील तरतुदी आणि मुलांकडे दुर्लक्ष आणि अत्याचारापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने बाल न्याय कायद्यातील कलमान्वये पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केल आहे. दरम्यान, सुविधा केंद्रातील इतर मुला-मुलींसोबतही गैरवर्तन करण्यात आले होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (हेही वाचा, Unnatural Sexual Assault Ahmednagar: 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, अहमदनगर येथे नऊ जणांवर गुन्हा दाखल)

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही केली असली तरी, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बालगृहात येणारी मुलेही अनेकदा अनाथ असतात. आगोदरच ती वेगळ्या मनस्थितीतून जात असतात. ज्या पीडितेसोबत ही घटना घडली. त्या मुलीच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे आपल्या मोठ्या बहिणीसह ही मुलगी बालगृहात आली आहे. तिला झोपेत लघुशंका करण्याची सवय आहे. ही सवय अनेक मुलांमध्ये दिसून येते. ही एक नैसर्गिक बाब असल्याचे डॉक्टरही सांगतात. असे असले तरी, बालगृहातील कर्मचाऱ्यांनी मात्र अत्यंत चुकीचे वर्तन करत तिला शिक्षा दिली. ज्यामुळे तिच्या गुप्तांगास जखमा झाल्या. आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.