Kerala: PPE किट घालून कोविड वॉर्डात पोहचली नवरी, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नवऱ्याने तेथेच बायकोच्या गळ्यात घातली वरमाला
Marriage Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरसमुळे सामान्यांना आयुष्य जगणे मुश्किलच झाले आहे. मात्र तरीही सध्याच्या परिस्थितीत रोजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशातच केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या वॉर्डात एक वेगळेच दृष्ट दिसून आले. तेव्हा चक्क PPE किटमध्ये नवरी पोहचल्याचे दिसले. कोविड वॉर्ड काही वेळासाठी लग्नाचा हॉलच वाटत होता असे चित्र निर्माण झाले होते.(Rajasthan: लॉकडाऊनमुळे महिला कॉन्स्टेबलला मिळाली नाही रजा; पोलिस ठाण्यातचं लावली हळद, पहा फोटो)

नवरा शरत मोन आणि नवरी अभिरामी हे दोघे अलाप्पुझा मध्ये राहणारे आहेत. काही दिवसांपूर्वी शरत याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. शरत हा विदेशात नोकरी करते आणि लग्नासाठी भारतात आला होता. तर लग्नाची खरेदी करताना त्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शरत याची आई जिजिमोल हिला सुद्धा कोरोना झाला. त्यामुळे ते दोघे अलाप्पुजा मेडिकल कॉलेजमधील कोविड वॉर्डात उपचारासाठी भरती झाले.

शरत आणि अभिरामी यांचे लग्न 25 एप्रिलला होणार होते. मात्र दोन्ही परिवाराने लग्नाची तारीख टाळण्याऐवजी रविवारीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडून लग्नासाठी त्यांनी परवानगी सुद्धा मिळवली, अखेर त्या दोघांचे लग्न आज संपन्न झाले. यासाठी नवरीच्या नातेवाईकांना सुद्धा पीपीई किट घालून वॉर्डात पाठवण्यात आले. वॉर्डात शरत याच्या आईने नव्या नवरीसाठी तिच्या मुलाला वरमाला सुद्धा घालण्यास दिली.(Rajasthan: 35 वर्षांनंतर कुटुंबात जन्मलेल्या मुलीला हेलिकॉप्टरमधून आणले घरी; जंगी स्वागतासाठी वडीलांनी केला 4.5 लाखांचा खर्च)

दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत काही ठिकाणी संपूर्ण किंवा विकेंड् लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लग्न समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रमांना सुद्धा स्थानिक प्रशासनाकडून नियमावलीचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र ज्यांचे लग्नाचे मुहूर्त होते त्यांनी अगदी साधेपणाने विवाह पार पाडला तर काहींनी मंदिराच्या गेटवरच लग्नगाठ बांधल्याचे तमिळनाडू मधील कुड्डालोर येथे दिसून आले.