Kashmir स्वतंत्र होणार, हाफिज मुहम्मद सईदचा दावा
हाफिज सईद (फोटो सौजन्य- ट्विटर)

Srinagar: मुंबई हल्ल्यामागील मास्टरमाईंड हाफिज मुहम्मद सईद (Hafiz Muhammad Saeed) याने काश्मिर (Kashmir) लवकरच स्वतंत्र होणार असा दावा केला आहे. त्यासाठी त्याने एक व्हिडिओ बनवून त्यामधून भारताला युद्धासाठीचे आव्हान दिले आहे. दोन दिवसांपूर्वी पुलवामा (Pulwama) येथे मारल्या गेलेल्या दशहतवाद्यांना उद्देशून हा व्हिडिओ बनविल्याचे सांगितले जात आहे.

हाफिज सईदने जनतेला भडकवत भारताविरुद्ध युद्ध करण्याचा इशारा दिला आले. तसेच भारतीय सैनिकांनी पुलवामा येथे दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावर दगडफेक केली होती. या दोन गटात झालेल्या चकमकीत सात स्थानिक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सैनिकांनी केलेला मुद्दा उचलून धरत हाफिज सईदने दहशतवद्यांना भारताविरुद्ध भडकवण्याचे काम करत आहे.

तसेच कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना उद्देशून हाफिजने असे म्हटले आहे की, 'तुम्ही दिलेले बलिदान फुकट जाणार नाही, त्याची परतफेड म्हणून तुम्हाला काश्मिर पुन्हा मिळवून देणार'. तर काश्मिर लवकरच स्वतंत्र होणार असल्याचा दिवस जवळ आला असून तुम्ही प्रयत्नशील राहा असे अवाहन त्याने दिले आहे. तर हाफिजने बनविलेल्या व्हिडिओमध्ये भारताला युद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले आहे.