23 ऑगस्ट पर्यंत कश्मीर येथे जाणारी सर्व उड्डाणे रद्द, प्रवाशांना मिळणार तिकिटाचे संपूर्ण पैसे
Representational Image (Photo Credits: Youtube Screenshot)

कश्मीर (Kashmir) मधील घाटी (Ghati) येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची सूचना आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-कश्मीर मधील परिस्थिती पुर्ववत होत असली तरीही प्रवाशांच्या सावधागिरीसाठी काही विमान कंपन्यांनी तेथे जाणारी सर्व उडाणे रद्द केली आहेत. तसेच ग्राहकांनी खरेदी केलेल्या तिकिटांचे पैसे सुद्धा त्यांना परत देण्यात येणार असल्याचे आवाहन कंपन्यांकडून करण्यात आले आहे.

सोमवारी कश्मीर घाटी मधील शाळा-महाविद्यालये आणि शासकीय ऑफिस चालू करण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकारने घोषणा केली आहे. मात्र विमान कंपन्यांनी कश्मीर मधील उड्डाणे का रद्द केली आहेत याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. स्पाइसजेट, इंडिगो आणि विस्तारा विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव 23 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रवाशांची तिकिटे रद्द केली आहेत. मात्र पुन्हा कश्मीर येथे जाण्यासाठी प्रवाशांनी तिकिटे खरेदी केल्यास त्यावेळी त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही आहेत. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी फोन क्रमांकसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.(जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत, जवानांना हाय अलर्ट जाहीर)

तसेच इंडिगो कंपनीने ट्वीटर, फेसबुक किंवा त्यांच्या बेबसाइच्या माध्यमातून या संदर्भात अधिक माहिती मिळवू शकतात असे सांगितले आहे. तर विस्तारा कंपनीने तिकिटाचे संपूर्ण पैसे परत मिळणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी विमान कंपन्यांनी दिलेल्या पूर्वसुचनेकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.