KSRTC bus. (Photo credits: PTI)

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) द्वारा चालवण्यात येणाऱ्या स्लीपर बसमध्ये मद्यधूंद प्रवाशाने लघुशंका म्हणजेच मूत्रविसर्जन केल्याची घटना घडली आहे.एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाकडून मूत्रविसर्जन केल्याची घटना नुकतीच घडली होती. ज्याची देशभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता तशाच प्रकारची घटना केएसआरटीसी बसमध्ये घडल्याचे पुढे येत आहे.

केएसआरटीसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, KA 19 F3554 नोंदणी क्रमांक असलेल्या KSRTC नॉन-एसी स्लीपर बसमध्ये मंगळवारी (21 फेब्रुवारी) रोजी घडली. ही बस विजयपुराहून मंगळुरूला निघाली होती. बस हबुळीदरम्यान आली असता प्रवाशाकडून ही घटना घडली.

ट्विट

केएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती सांगितले की, हे कृत्य पुरुष प्रवाशाने केले. तो सुमारे 32 वयोगटातील आहे आणि तो सीट क्रमांक29 वरुन प्रवास करत होता. तो अनारक्षीत पद्धतीने प्रवास करत होता. याच बसमधून एक महिला अनारक्षित सीट 3 वर प्रवास करत होती. रात्री 10.30 च्या सुमारास, बस जेवणाच्या विश्रांतीसाठी हुबलीजवळील किरेसुरू हॉटेलमध्ये थांबली या वेळी त्याने हे कृत्य केले.