Karnataka News: भारतामध्ये विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. याचाच एक भाग म्हणऊन मुळची टेक्सास येथील कंपनी क्रेप्टॉन सोलुशन हीसुद्धा भारतात व्यवसाय सुरु करु शकते असा अंदाज वर्तवला जातो आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही कंपनी कर्नाटक राज्यात जवळपास USD 100 मिलीयन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 832 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. ही कंपनी या राज्यात प्रिंटेड सर्किट बोर्ड फॅब्रिकेशन युनीट उभारु शकते. याशिवाय सेमीकंडक्टर उत्पादन कंपनीने राज्यात R&D विस्तारासाठीही विचार सुरु केला आहे.
मोठे आणि मध्यम उद्योग मंत्री एम बी पाटील यांच्या नेतृत्वात कर्नाटक सरकारचे एक अधिकृत शिष्टमंडळासह युनायटेड स्टेट्समध्ये गेले. त्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये विविध मुद्द्यांवर विचारविनीमय केला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, नवीन PCB सुविधेसाठी बेंगळुरूमधील बोम्मासांद्रामध्ये गुंतवणूक करण्याची योजना असलेल्या क्रिप्टन सोल्युशन्सने आधीच सरकारशी प्राथमिक चर्चा पूर्ण केली.
त्यांनी पुढे सांगितले की, शिष्टमंडळासोबत कंपनीच्या चर्चेत राज्यातील म्हैसूर आणि चामराजनगरा येथील गुंतवणुकीच्या पर्यायांचाही शोध घेण्यात आला. क्रिप्टनला स्थानिक भागीदारी करण्यामध्ये रुची आहे. भारतीय बाजारपेठेत योग्य प्रवेश आणि वाढीचा भागीदार ओळखण्यासाठी समर्थन मिळावे हे देखील बैठकीत मांडण्यात आले, असेही या शिष्टमंडळाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.