कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) नेते डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक न्यायालयाच्या निर्देशानुसार मंड्या ग्रामीण पोलिसांनी केपीसीसी अध्यक्ष डिके शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. डीके शिवकुमार यांचा 28 मार्च रोजीच्या एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 'प्रजा ध्वनी यात्रे' (Praja Dhwani Yatra) दरम्यानचा होता. तसेच, व्हिडिओमध्ये डीके शिवकुमार हे 500 रुपयांच्या नोट सदृश्य कागद लाकारांना वाटत असताना दिसत होते.
काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर 29 मार्च रोजी व्हायरल झाला होता. या व्हिडओवरुन दावा करण्यात आला होता की, डीके शिवकुमार यांनी एका रॅलीदरम्यान नागरिकांना 500 रुपयांच्या नोटा वाटल्या किंवा या नोटा उधळल्या. वृत्तसंस्था एएनआयनेही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. उल्लेखनीय असे की, हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा निवडणूक आचारसंहिता लागू नव्हती. निवडणूक आयोगाने निवडणुकाही जाहीर केल्या नव्हत्या. (हेही वाचा, काँग्रेसे नेते DK Shivakumar यांनी उधळल्या 500 रुपयांच्या नोटा? (Watch Video))
दरम्यान, कर्नाटक विधानसभेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 30 मार्च (बुधवार) रोजी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. कर्नाटक राज्याची ही पंधरावी विधानसभा निवडणूक आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका 10 मे 2023 रोजी एकाच टप्प्यात होणार आहेत. निवडणुकीचे निकाल 13 मे 2023 रोजी जाहीर होतील. त्यामुळे कर्नाटक राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
ट्विट
#UPDATE | Karnataka: On the direction of a Local Court in Mandya, Mandya rural police booked KPCC president DK Shivakumar who was seen throwing Rs 500 currency notes on the artists near Bevinahalli in Mandya district during the ‘Praja Dhwani Yatra’ held on March 28: Police https://t.co/4y9JHRIeHz
— ANI (@ANI) April 4, 2023
लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारार्थ कर्नाटक राज्यातील कोलार येथून एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केलेल्या एका टिप्पणीवरुन त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात काँग्रेस नेत्यांविरोधात दाखल होणारे गुन्हे आणि न्यायालयात प्रकरणांकडे अवघ्या देशाचे लक्ष वेधले जाते. याच पार्श्वभूमीवर डीके शिवकुमार यांच्यावर दाखल गुन्ह्याकडेही पाहिले जात आहे.