Karnataka: तरुणीशी बोलल्याच्या कारणावरून मुलाचे अपहरण करून मारहाण; आरोपींना अटक
Beating | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकमध्ये महाविद्यालयीन तरुणीशी बोलल्याच्या कारणावरून मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली. केशवापूर येथील तलावरा ओणी येथील मोहम्मद घौस आणि शबरीनगर येथील रहिवासी सोहेल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.