CEC Rajiv Kumar | (Photo Credit: ANI)

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज (29 मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभा निवडणूक कार्यक्रम (Karnataka Assembly Election 2023 Schedule जाहीर केला. त्यानुसार कर्नाटक राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 13 मे रोजी मतमोजणी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (CEC Rajiv Kumar) यांनी ही माहिती दिली.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारली जातील. उल्लेखनिय असे की, 1 एप्रिलपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नोंदणीकृत सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील. नवोदीत मतदारांची संख्या 9.17 लाखांनी वाढली असल्याचेही आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. (हेही वाचा, Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाची 11.30 वाजता पत्रकार परिषद)

व्हिडिओ

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी नोंदणीकृत मतदारांची संख्या पुढील प्रमाणे:

पुरुष मतदार: 2,62,42,561, महिला मतदार: 2,59,26,319 म, थर्ड जेंडरमतदार: 4,699, लिंग गुणोत्तर: 988, ऐंशी वर्षावरील मतदार : 12.15 लाखांहून अधिक आहेत. तर PwD मतदारांची संख्या 5.55 लाखांहून अधिक आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या (3 मार्च 2023 पूर्वी नोंदणी झालेलेले) मतदारांची संख्या (18-19 वर्षे) 9,17,241 इतकी आहे.

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिल्लीतील विज्ञान बजवान येथील प्लेनरी हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली. भारताचे निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि ECI अरुण गोयल यांनी बुधवारी सकाळी 11:30 वाजता कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले.