मांत्रिकाच्या सांगण्यावरून 7 वर्षीय मुलीची हत्या करून यकृत (Liver) खाल्ल्याप्रकरणी घाटमपूरमध्ये चौघांना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर 2020 ची आहे. कोर्टात झालेल्या सुनावणी नंतर न्यायालयाने आरोपी जोडपं परशूराम आणि सुनैना आणि त्यांचा पुतण्या अंकुल व त्याचा सहकारी विरेन यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. 3 वर्ष कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीनंतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
कोर्टाने प्रत्येकी 45 हजारांचा दंड अंकुल आणि विरेनला ठोठावला आहे. तर 20 हजारांचा दंड परशूराम आणि सुनैनाला प्रत्येकी सुनावला आहे. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील राम रक्षित शर्मा, प्रदीप पांडे आणि अजय कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, घाटमपूर येथील एका गावातील रहिवाशाने 14 नोव्हेंबर 2020 रोजी तिची सात वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
गावाबाहेर या मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेमधील मृतदेह आढळला. पोलिसांनी त्यावरून FIR दाखल केला. परशूराम, सुनैना, अंकुल आणि विरेन यांचा तपास सुरू झाला. या चौकशी आणि तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, परशूराम आणि सुनैना लग्नानंतर 19 वर्ष निपुत्रिक होते. त्यांनी मांत्रिकाकडे सल्ला घेतला तर त्याने या जोडप्याला मुलीचं यकृत खाण्याचा सल्ला दिला. Young Temple Priest Killed: तरुण पुजाऱ्याची निर्घृण हत्या, डोळे आणि जीभ नसलेला मृतदेह आढळला; बिहार पोलिसांची चौकशी सुरु .
अंकुल आणि विरेन यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. तिचं यकृत बाहेर काढलं. ते परशूराम आणि सुनैनाला दिलं.