उत्तर प्रदेशातील (UP) कानपुर (Kanpur) मध्ये पार्वो संक्रमणामुळे (Parvo Virus) कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या व्हायरसमुळे अचानक आठ कुत्र्यांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. पशु चिकित्सकांच्या टीमने दोन कुत्र्यांचे शवविच्छेदन सुद्धा केले आहे. असे सांगितले जात आहे की, कुत्र्यांच्या आतड्यांमध्ये हे संक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. आतड्या सडल्याने कुत्र्यांच्या पोटात रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या. तसेच मृत्यूपूर्वी कुत्र्यांना रक्ताच्या उलट्या ही झाल्या होत्या. पशु चिकित्सकांचे असे मानणे आहे की, ऋतुच्या बदलांमुळे हा व्हायरस कुत्र्यांमध्ये सक्रिय होतो.
भीतरगाव मधील क्योंटारा गावात हा प्रकार घडला असून आठ कुत्र्यांच्या अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. सुचना मिळाल्यानंतर पशु चिकित्सकांच्या टीमने क्योंटारा गावात पोहचली आणि कुत्र्यांबद्दल अधिक माहिती मिळवली. पशु चिकित्सक सर्वेंद्र सचान यांचे असे मानणे आहे की, पार्वो व्हायरसमुळे मोठ्या जनावरांना कोणताच धोका नसतो. पण लहान जनावरांवर त्याच्यावर परिणाम होतो. हा व्हायरस त्यांच्या आतड्यांमध्ये परसला जातो.(Locusts Attack: आफ्रिकेत पुन्हा एकदा टोळधाड सक्रिय झाल्याने शेतकरी त्रस्त, सरकारकडून किटकनाशक फवारणीसाठी विमान तैनात)
Tweet:
After bird flu hit the avians, now the canines in #Kanpur are reportedly affected by a deadly virus called Parvo.
Eight dogs have reportedly died in Kanpur due to the deadly Parvo virus.
Photo: IANS (Representational image) pic.twitter.com/6qwBEnRpAj
— IANS Tweets (@ians_india) February 26, 2021
ओपी वर्मा यांनी असे म्हटले की, कुत्र्यांमध्ये होणारा पार्वो व्हायरस अत्यंत धोकादायक असतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे या आजावर उपचार नाही झाला तर अशाच पद्धतीने कुत्र्यांचा मृत्यू होत राहील. या घातक अशा व्हायरसपासून कुत्र्यांचा बचाव करण्यासाठी जन्मलानंतर दीड ते साडे तीन महिन्यांदरमय्यान तीन लस द्याव्या लागतात. त्याचसोबत पार्वो व्हायरस झाल्यानंतर कुत्र्यांमध्ये काही बदलाव सुद्धा दिसून येतात. सुरुवातीला खोकला येतो. त्यानंतर कुत्रे खाण-पिण सोडून देतात. संक्रमण अधिक वाढल्यास त्यांना रक्ताच्या उलट्या सुद्धा होतात आणि त्यांचा मृत्यू होतो.