Locusts Attack: आफ्रिकेत पुन्हा एकदा टोळधाड सक्रिय झाल्याने शेतकरी त्रस्त, सरकारकडून किटकनाशक फवारणीसाठी विमान तैनात
A swarm of locusts (Photo Credits: IANS)

Locusts Attack: आफ्रिकेपासून (Africa) ते भारतात (India) आपली दहशत पसरवणारी टोळधाड पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. तर आफ्रिकेतील तांझानियाच्या उत्तरेला असलेल्या किलीमांजारो परिसरात टोळधाडीने जोरदार हल्ला केला आहे. टोळधाडीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासह ते त्रस्त झाले आहेत. त्यांना आता शेतीची अधिक चिंता वाटू लागली आहे. त्याचसोबत आफ्रिकेत टोळधाडीमुळे आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की, ते एशियातील पाकिस्तान आणि भारताकडे वळले जाऊ नयेत.

तांझिनियाचे जिल्हा आयुक्त ओनेस्मो बिसवेलू यांनी असे म्हटले की, सिहा जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी टोळधाडीने आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी सरकारने किटकनाशक फवारणी करणारे एक विमान तैनात केले आहे. त्यामुळे टोळधाडीवर सध्या नियंत्रण आले असून शेतीचे फार कमी नुकसान झाले आहे. असे मानले जात आहे की, ऋतू बदल्याने पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत टोळधाड सक्रिय झाली आहे.(Locust Attack: टोळधाड म्हणजे काय? शेती आणि शेतकऱ्याला किती नुकसानकारक?)

यापूर्वी इतिहासातील सर्वाधिक मोठा टोळधाडीचा हल्ला केनियात झाला होता. कोटीच्या संख्येने केनियात दहशत माजवली होती आणि संपूर्ण शेतीचे नुकसान केले होते. त्यामुळे केनियात खाण्याचे संकट निर्माण झाल्याची स्थिती दिसून आली होती. टोळधाडीने एशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये गेल्या वर्षात प्रचंड नुकसान केले आहे. एका जागेवरुन दुसरीकडे स्थलांतर करणारे Locusta Migratoia जगात सर्वाधिक फैलाव करत आहेत.

टोळधाडीमुळे शेतीचे फार मोठे नुकसान होते. हे ऐवढे भयंकर असतात की कोणत्याही क्षेत्रात जेवढे खाणे 35 हजार लोकांसाठी असते तेवढे ते एकाच दिवसात खातात. वर्ल्ड बँकेच्या मते ईस्ट आफ्रिका आणि यमन मध्ये या वर्षात टोळधाडीमुळे 8.5 अरब डॉलरचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी खासकरुन किटकनाशके किंवा जाळी पसरवण्याचा मार्ग अवलंबला जातो.