शबरीमाला मंदिर मध्ये प्रवेश करणाऱ्या सुनेला सासुकडून मारहाण
Sabarimala Temple (Photo Credits: ANI)

केरळ (Kerala) येथील शबरीमाला मंदिर (Sabarimala temple) मध्ये प्रवेश करणाऱ्या महिलेला सासुकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 2 जानेवारी रोजी शबरीमाला मंदिरात कनकदुर्गा आणि बिंदू (Bindu) नावाच्या महिलेने प्रवेश करुन दर्शन घेतले होते. यामुळे राज्यात सर्वत्र वाद निर्माण झाला होता. तसेच महिलांनी प्रवेश घेतल्याने शबरीमाला मंदिर शुद्धीकरणासाठी काही वेळासाठी बंद करण्यात आले होते.

कनकदुर्गा (Kanaka Durga) असे या महिलेचे नाव आहे. कनकदुर्गा हिने शबरीमाला मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने तिची सासु संतापली होती. त्यामुळे सासुने कनकदुर्गा हिला जबरदस्त मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. विरोधकर्त्यांकडून तिला मारहाण होण्याची शक्यता असल्याने कनकदुर्गाने मंदिरात प्रवेश घेतल्यानंतर ती विविध ठिकाणी राहू लागली होती. रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी (15 जानेवारी) विरोधकर्त्यांच्या तावडीतून वाचत ती घरी परतली होती. त्यावेळीच तिच्या सासुने कनकदुर्गा हिला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.(हेही वाचा- 'शबरीमाला मंदिरा'त दोन महिलांच्या प्रवेशानंतर राज्यात ठिकठिकाणी हिंसाचार; आज 'केरळ बंद'ची हाक)

या प्रकरणी कनकदुर्गा हिच्या घराबाहेर पोलीस उभे असून ही तिच्या बचावासाठी त्यांना काही करता आले नाही.तसेच शबरीमाला मंदिरात 10 ते 15 वर्षीय मुलींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला होता. तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर ही महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीही दोन महिलांनी मंदिरात घुसुन भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले होते.