काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाअंतर्गत नेत्यांचे राजीनामा सत्र अद्याप सुरुच आहे. तर आज मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुंबईतील काँग्रेस पक्षातील अध्यक्षपद सोडले आहे. त्यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच पक्षात दिलेल्या स्थानाबद्दल त्याअंतर्गत सेवा करण्याती संधी मिळाली याबाबत मी आभारी असल्याचे त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
Jyotiraditya Scindia resigns as as General Secretary of All India Congress Committee (AICC). (File pic) pic.twitter.com/CSl1jVBL18
— ANI (@ANI) July 7, 2019
काँग्रेसचे युवा नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा आपल्या महासचिव पदाचा राजीनामा दिला होता. सिंधिया यांनी सुद्धा राहुल गांधींप्रमाणेच लोकसभेतील पराभवाचे कारण देत पदत्याग केला. काँग्रेसमधील हे राजीनामा सत्र पाहता महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोपवण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.