लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसची घडी आणखीनच विस्कळीत होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या पदाचा त्याग करताच त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्रच सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress President) अध्यक्ष मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या पदाचा राजीनाम सोपवतांना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Elections) मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे
ANI ट्विट
Mumbai Congress President Milind Deora tenders his resignation from his post. He has also proposed a three member panel to lead Mumbai Congress for the upcoming Maharashtra Assembly elections. (file pic) pic.twitter.com/aPmfaF1LCt
— ANI (@ANI) July 7, 2019
दरम्यान, आज सकाळी काँग्रेसचे युवा नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा आपल्या महासचिव पदाचा राजीनामा दिला होता. सिंधिया यांनी सुद्धा राहुल गांधींप्रमाणेच लोकसभेतील पराभवाचे कारण देत पदत्याग केला. काँग्रेसमधील हे राजीनामा सत्र पाहता महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोपवण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.