Johnny Pierce | Photo Credits: Twitter/ ANI

सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरत आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळत असून दिवसागणिक त्याच्यामध्ये वाढ आहे. अशामध्ये आता केरळात कोच्चीमध्ये मागील 5 महिन्यांपासून असलेल्या Johnny Pierce यांनी त्यांचा व्हिसा प्रवासी वरून बिझनेस व्हिसा करून द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान त्यासाठी त्यांनी केरळच्या उच्च न्यायालयामध्ये देखील याचिका दाखल केली आहे. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना Johnny Pierce यांनी सांगितले आहे की 'मी भारतामध्ये अडकून पडलेलो नाही तर मला इथंच रहायचं आहे. भारतासारखी काळजी अमेरिकेमध्ये घेतली जात नाही. सध्या अमेरिकेत कोविड 19 मुळे गोंधळाची परिस्थिती आहे. '

अमेरिकेमध्ये परत जाण्यापेक्षा मला भारतामध्येच टुरिंग बिझनेस सुरू करायला आवडेल. केरळमध्ये मला अजून 180 दिवस राहण्याची मुभा मिळावी आणि ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्यासाठी बिझनेस व्हिसा मिळावा त्यासाठी याचिका करण्याची तयारी Johnny Pierce यांची आहे. त्यांनी कुटुंब देखील आपल्यासोबत इथे असतं तर चांगलं झालं असतं अशी भावना देखील बोलून दाखवली आहे. भारतामध्ये ज्या पद्धतीने स्थिती हाताळली जात आहे त्याने मी प्रभावित आहे. अमेरिकेमध्ये लोकं COVID 19 बाबत सजग नाहीत.

ANI Tweet

worldometers.info च्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये सध्या कोरोना बाधितांचा आकडा 3,291,786 आहे. 136,671 जणांचा मृत्यू झाला आहे. 1,460,495 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1,694,620 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.