Kanhaiya Kumar (Photo Credits-Twitter)

दिल्ली सरकारने राजद्रोहाच्या प्रकरणी जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि अन्य दोन जणांवर खटला चालवण्याची दिल्ली पोलिसांनी मंजूरी दिली आहे. सुत्रांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी 2016 मध्ये या प्रकरणी कन्हैया कुमार यांच्यासह जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी असे सांगितले होते की, आरोपींनी 9 फेब्रुवारी 2016 मध्ये जेएनयू परिसरात एका कार्यक्रमाच्या दरम्यान रॅली काढली होती. तेथे कथित रुपात त्यांनी देशाच्या विरोधात लावण्यात येणाऱ्या घोषणाबाजींचे समर्थन केले होते.

दरम्यान, जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार यांच्यावर 2016 मध्ये जेएनयू परिसरात भारताच्या विरोधात करण्यात येणाऱ्या घोषणाबाजीचे समर्थन आणि द्वेश पसरवण्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापूर्वी आरोपत्र दाखल केले होते. कन्हैया कुमार  यांच्यावर देशद्रोहासह अन्य आरोप लावण्यात आले होते.(राहुल गांधीं च्या 'सारे मोदी चोर हैं' विधानासंदर्भातील प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून दिलासा)

तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पटियाला हाउसच्या मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट सुमीत आनंद यांनी कोर्टात 1200 पानांचे चार्जशीट दाखल केले होते. या चार्जशीटमध्ये कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान यांच्यासह अन्य सात कश्मीरींचा आरोपी म्हणून समावेश होता. या प्रकरणी सर्व कश्मीरी विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात चार्टशीटमध्ये विविध कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.