Jaish-e-Mohammad Terrorist Arrested: जम्मू काश्मीर मध्ये कुपवाडा येथुन जैश-ए- मोहम्मद च्या दोन दहशतवाद्यांंना 7 लाख रुपयांंसह अटक
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

जम्मु काश्मीर (Jammu Kashmir) च्या कुपवाडा (Kupwada) जिल्ह्यातुन जैश- ए- मोहम्मद (Jaish- E- Mohammad) या कुख्यात दहशतवादी संंघटनेच्या दोन दहशतवाद्यांंना अटक करण्यात भारतीय सैन्याला (Indian Army) यश आले आहे. यासोबतच 7 लाख रुपये सुद्धा सैन्याने जप्त केले आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती काहीच वेळात समोर येईल. एकीकडे भारत चीन तणावपुर्ण परिस्थिती (India - China Tensions) असताना जम्मु काश्मीर मध्ये सुद्धा दहशतवादी संंघटनांंचे विद्रोही प्रयत्न सुरु आहेत, मात्र भारतीय जवान या सगळ्या प्रयत्नांंना मोडुन पाडत आहेत. आज सकाळी सुद्धा बारामुल्ला (Baramulla ) जिल्ह्यातील चटलोरा रफीबाद परिसरातील वॉटरगाम गावात सुरक्षा दलांनी आयईडी जप्त केला होता. Jammu Kashmir: जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान चा झेंडा फडकवणार्‍या तिघांंना अटक, एक हॅण्ड ग्रेनेड सुद्धा जप्त

यापुर्वी 8 सप्टेंंबर रोजी मध्यरात्री जम्मू काश्मीर पोलिसांंच्या माहितीनुसार शोधमोहिम राबवत असताना सुरुवातीला सैन्याला काही हत्यारे आणि नंंतर दहशतवादी पकडण्यात यश आले होते, प्राथमिक माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानातील सक्रिय दहशतवादी संंघटनेचे सदस्य होते तसेच 5/6 सप्टेंंबर रोजी त्यांंनी  सांबा येथून शस्त्र गोळा केले आणि काश्मीर खोर्‍यात गेले असे समजत आहे. त्यांंच्याकडुन जप्त करण्यात आलेल्या हत्यारात AK 47 बंंदुकांंपासुन M4 US Carbine, 6 Chinese Pistols यांंचा समावेश होता.

ANI Tweet

दरम्यान, दहशतवादी कारवायांसोबतच सीमा भागात मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा सुद्धा प्रयत्न होत आहे, सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात पंंजाब येथे BSF च्या जवानांंनी अशाच 5 घुसखोरांंना ठार केले होते तर याच आठवड्यात राजस्थान जवळ सुद्धा 3 घुसखोर तस्करांंना भारतीय जवानांंनी ठार केले होते.