Jharkhand Election Vidhan Sabha Exit Poll Result 2019: झारखण्ड विधानसभा निवडणूक 2019 एक्झिट पोल्स अंदाज सायंकळा 6 वाजात होणार जाहीर

Jharkhand Election Exit Poll Result 2019: झारखण्ड विधानसभा निवडणूक 2019 (Jharkhand Assembly Election 2019) मतदानाचा पाचवा आणि अंतिम टप्पा आज (शुक्रवार, 20 डिसेंबर 2019) पार पडत आहे. आज सायंकाळी 6 वाजता मतदानाची प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, ही प्रक्रिया पार पडताच प्रसारमाध्यम समूह आणि संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे म्हणजेच एक्झिट पोल्सचे निकालही जाहीर होणार आहेत. झारखण्ड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण पाच टप्प्यांत मतदान पार पडले. या सर्व टप्प्यांमध्ये दिसून आलेला एक्झिट पोल्सचा अंदाच आज सांयकाळी 6 वाजता जाहीर होत आहे. एक्झिट पोल्सच्या या अंदाजांकडे राजकीय पक्ष, नेते, सर्वसामान्य जनता आणि विविध क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहेत. Marathilatestly.com वर सर्वच एक्झिट पोल्स निकाल तुम्ही एकाच छताखाली पाहू शकता.

झारखण्ड विधानसभा निवडणुकीसाठी पार पडत असलेले मतदानशुक्रवारी सायंकाळी संपत आहे. त्यानंतर काही सेकंदातच विविध संस्था, प्रसारमाध्यमसमूहांनी केलेल्या एक्झिट पोल्स अंदाज जाहीर होण्यास सुरुवात होईल. अर्थात हे अंदाज त्याच्या संस्था, प्रसारमाध्यमं मोठ्या उत्साहाने व्यक्त करत असले तरी, हे काही अंतिम निकाल नसतात. एक्झिट पोल्सचे अंदाच खुपच कमी वेळा खरे ठरले आहेत. अनेकदा एक्झिट पोल्स तोंडावरही आपडले आहेत.

अलिकडेच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सनी राणा भिवदेवी थाटात आपले अंदाच व्यक्त केले होते. या अंदाजांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल. तसेच, शिवसेना दुसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अनुक्रमे तिसऱ्या आणि चौध्या स्थानावर दर्शवले होते. प्रत्यक्षात मात्र, भारतीय जनता पक्षाला कशाबशा 105 जागा मिळाल्या. शिवसेना पक्षालाही 2014 च्या तुलनेत कमी यश मिळाले पण शिवसेने 57 राष्ट्रवादी काँग्रेस 54 तर काँग्रेस 44 जागांवर विजयी झाले. या निकालाचा एक्झिट पोल्स अंदाजासाठी संबंध लावायचा झाल्यास एक्झिट पोल्स तोंडावरच आपटले. (हेही वाचा, निवडणूक आयोगाकडून झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा, 5 टप्प्यात मतदान 23 डिसेंबरला मतमोजणी)

दरम्यान, 1 नोव्हेंबर 2019 रोजी निवडणूक आयोगाने झारखण्ड विधानसभा निवडणूक (Jharkhand Legislative Assembly Elections 2019) तारखांची घोषणा केली. या घोषणेनुसार झारखण्ड विधानसभेची निवडणूक 5 टप्प्यात पार पडत पडली. पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा टप्पा 12 डिसेंबर, चौथा टप्पा 16 डिसेंबर तर पाचवा टप्पा 20 डिसेंबर रोजी पार पडत आहे. तर, 23 डिसेंबर 2019 या दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.