झारखंड विधानसभा निवडणूक (Jharkhand Assembly Elections 2019) निकालासाठी आज, 23 डिसेंबर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यंदा मुख्य निवडणूक आयोगाच्या तर्फे 30नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पूर्ण 81 विधानसभा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. सुरुवातीच्या मतमोजणी मध्येच निकालाचे कल हे JMM सहित मित्रपक्षांच्या बाजूने झुकताना दिसून आले होते तर सध्याची परिस्थिती पाहता महागठबंधनातील पक्ष हे 45 चा आकडा पार करून आघाडीवर आहेत तर भाजप (BJP) कडे सध्या 25 जागांवरील आघाडी शिल्लक आहे. या आघाडीवरील जागांवर नेमके कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार खिंड लढवत आहेत हे आता आपण पाहणार आहोत.
झारखंड मधील सद्य विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि राष्ट्रीय जनता दल यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर करत JMM तर्फे 43 जागांवर तर काँग्रेस तर्फे 31 आणि आरजेडी तर्फे 7 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. तर महागठबंधनाच्या विरोधात भाजपकडूनही मातब्बर मंडळी मैदानात होती.
झारखंड विधानसभा निवडणूक 2019 निकाल आणि विजयी उमेदवार
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपला 37 तर आजसूला 5 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विधानसभेत 45 हा बहुमताचा जादूई आकडा आहे. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला आजसूची मदत घ्यावी लागली. दरम्यान, आपले बहुमत अधिक बळकट करण्यासाठी भाजपने पुढे झारखंड विकास मोर्चाच्या 6 आमदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन सरुकार स्थापन केले होते. मात्र सद्य घडीचे निकालाचे आकडे पाहता महाराष्ट्र पाठोपाठ आणखीन एक महत्वाचे राज्य भाजपच्या हातून सुटल्याचे संकेत आहेत.