Jharkhand Accident News: झारखंडमध्ये लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाला ट्रकने चिरडले; दोघांचाही मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लग्न करण्यासाठी निघालेल्या प्रेमी युगुलाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना झारखंडमध्ये घडली.  झारखंडच्या रांची-चाईबासा मुख्य मार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघाताची (Jharkhand Accident) घटना घडली. महामार्गावर भरधाव ट्रकने एका भरधाव दुचाकीला चिरडले. या अपघातात तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (हेही वाचा - Bihar Accident: गावाला जाताना कारचा अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर)

रविवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावर भरधाव ट्रकने एका भरधाव दुचाकीला चिरडले. यावेळी दुचाकीवर एक प्रेमी युगूल आणि त्यांचा मित्र प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तरुण- तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.   या अपघातातील जखमी तरुणावर चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जमशेदपूरला पाठवण्यात आले.या जखमी तरुणाचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत तरुणांच्या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश केरई आणि नरसिंग केरई हे दोघे दुचाकीवरून गावी गेले होते. त्यानंतर रमेश केरई हा तरुण आपल्या मैत्रिणीसह दुचाकीने चक्रधरपूरकडे निघाला होता. नरसिंग केरई हा दुचाकी चालवत होता, तर रमेश केरई आणि त्याची मैत्रीण मागे बसले होते. दुचाकी खरसावन वळणावर येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला चिरडले. दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली अन् प्रियकर-प्रेयसीचा मृत्यू झाला.