जेसिका लाल (Jessica Lal Murder Case) हत्येप्रकरणी दोषी असलेल्या मनु शर्माला (Manu Sharma) तिहार कारागृहातून (Tihar Jail) मंगळवारी म्हणजेच 2 जून रोजी बाहेर सोडण्यात आले आहे. दिल्ली कोर्टाने (Delhi Highcourt) मनु शर्मा याची जन्मठेपेची शिक्षा बदलली आहे. राज्यपाल अनिल बैजल (Governor Anil Baijal) यांनी मनु शर्मा यांच्यासह अन्यही विविध गुन्ह्यातील 18 कैद्यांना सोडून दिले आहे. दिल्ली तुरूंग आढावा मंडळाच्या (SRB) शिफारसीनुसार मनू शर्मा याने 17 वर्षांच्या तुरूंगवासात केलेल्या चांगल्या वर्तणुकीला लक्षात घेत त्याला सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणा एसआरबीने गेल्या महिन्यात शर्माच्या रिलीझची शिफारस केली होती. 11 सप्टेंबर रोजी दिल्लीचे गृहमंत्री सत्यंदर जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसआरबीच्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली होती. शिक्षा पुनरावलोकन मंडळाने जेसिका लाल हत्याकांडातील दोषी मनु शर्माची अकाली सुटका करण्याची शिफारस केली होती. यावर आज राज्यपाल अनिल बैजल यांनी परवानगी देऊन मनू शर्मा ला सोडले आहे.
ANI ट्विट
Correction: Convict in 1999 Jessica Lal murder case Manu Sharma released from Tihar Jail yesterday on the grounds of good behaviour after 17*years of imprisonment. pic.twitter.com/VTgtckzeP8
— ANI (@ANI) June 2, 2020
माजी केंद्रीय मंत्री वेणोद शर्मा यांचा मुलगा मनु शर्मा याला दिल्ली हायकोर्टाने 2006 एप्रिल मध्ये जेसिका लालच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 30 एप्रिल 1999 रोजी मॉडेल जेसिका लाल हिची हत्या करण्याचा मनू शर्मा याच्यावर आरोप होता. सुरुवातीला कोर्टाने त्याला निर्दोष सोडले होते, परंतु उच्च न्यायालयाने हा आदेश फिरवला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एप्रिल 2010 मध्ये त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. बिना रामानी यांच्या मालकीच्या तामारिंद कोर्टाच्या रेस्टॉरंटमध्ये जेसिका लाल हिने मद्यपान करण्यास नकार दिल्यानंतर शर्मा यांनी तिला गोळ्या घालून ठार मारले होते. ही घटना बरीच वर्षे चर्चेत होती.