JCC कडून व्हिडिओ जाहिर, जामिया मिलिया इस्लामिया लायब्रेरीत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस
JNU Student Protest | (Photo Credits: ANI)

जामिया मिलिया इस्लामियात (Jamia Millia Islamia) शनिवारी पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओतून प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ जामिया कॉर्डिनेशन कमेटी (JCC) यांनी जाहिर केला असून त्यामध्ये लायब्ररीत असेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे दिसून आले आहे. कमेटीने असा दावा केला आहे की, 15 डिसेंबरला जेव्हा नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले त्यावेळी पोलिसांनी जामियामधील विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आले. व्हिडिओत विद्यार्थी लायब्रेरी मध्ये अभ्यास करत असतानाच अचानक पोलिसांनी येऊन त्यांना मारण्यास सुरुवात केली. तसेच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके सुद्धा दिसून येत आहेत.

जामियाच्या कमेटीने यावर स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांकडून हिंसा करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जामियाचे विद्यार्थी परिक्षेची तयारी रिडिंग हॉल मध्ये करत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला आहे. यावर पोलिसांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे. त्यांनी व्हिडिओत काही जणांनी मुखवटे चढवलेले होते. शनिवार पासून जामियाच्या कमेटीकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. पण गुन्हे शाखेला याबाबत तपास करण्यासाठी यापूर्वीच सांगण्यात आले होते. या व्हिडिओची तपासणी करण्यात येणार आहे.(चेन्नईत CAA आणि NRC विरोधात हिंसक आंदोलन, 100 हून अधिक जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात)

Tweet:

दरम्यान जामिया मिलिया इस्लामियाचा जामिया कॉर्डिनेशन कमिटी सोबत काही संबंध नाही आहे. ही कमेटी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तसेच आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कमेटीच्या माध्यमातून माजी विद्यार्थी सुद्धा पुढे आले आहेत.