दिल्लीच्या (Delhi) जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (Jawaharlal Nehru University) एम.ए. (M.A.) करत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ऋषी थॉमस असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो एम.ए. इंग्रजीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. (इंस्टाग्राम पोल वर फॉलोअर्सनी दिलेला सल्ला ऐकून 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या)
पंख्याला गळफास घेत त्याने आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने प्राध्यापकांना ई-मेल करुन सुसाईड नोट पाठवली. विद्यापीठातील वॉर्डन आणि इतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टडी रुम आतमधून बंद होती. दरवाजा वाजल्यावर आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने खिडकी उघडून पाहिल्यावर ऋषीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
वैद्यकीय तपासणीनंतर विद्यार्थ्याला मृत घोषित करण्यात आले. मात्र आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.