Corona Virus: भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी एअर इंडिया कंपनीचे विशेष विमान वुहान येथे दाखल; 31 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jan 31, 2020 09:40 PM IST
देशामध्ये भारतीय बॅंक महासंघ (IBA) सोबत पगारवाढी (Salary Hike) बाबत सुरू असलेल्या वाटाघाटी असफल ठरल्याने आज 31 जानेवारी रोजी बॅंक कर्मचार्यांच्या संघटनांकडून संप पुकारण्यात आला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस हा संप असणार आहे तर 2 फेब्रुवारी रोजी साप्ताहिक सुट्टी रविवार असल्याने सलग तीन दिवस बँका बंद (Bank Employee Strike) राहणार असल्याचे समजतेय.
प्राप्त माहितीनुसार, सध्या IBA कडून 12.25% वाढ दिली जात आहे परंतु UFBU कडून 15% पगारवाढीची मागणी आहे. नोव्हेंबर २०१७ पासून ही मागणी प्रलंबित आहे. अद्याप या मागणीवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेरीस बँक संघटनांनी हे संपाचे हत्यार उपसल्याचे सांगितले जात आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया सहित अन्य बँकांनी या संपाविषयी ग्राहकांना गुरुवारी माहिती दिली. सलग दोन दिवस चालणाऱ्या या संपामुळे कामकाजावर परिणाम होईल, असे या बँकांनी ग्राहकांना सांगितले आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दुसरीकडे, आज 2012 निर्भया बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे, उद्या १ फेब्रुवारी रोजी दोषींची नियोजित फाशी पुढे ढकलण्याच्या याचिकेवर कोर्टाचा काय निर्णय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर आज, संसदेत बजेट सेशनला सुरूवात होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या इकनॉमिक सर्व्हे रिपोर्ट सादर करणार आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्स्क असल्याने प्रचाराची गती वाढली आहे, आप कडून अरविंद केजरीवाल ही रॅली घेत नागरिकांशी संवाद साधतायत तर भाजपकडून स्मृती इराने, अमित शाह, जेपी नड्डा यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.