नागरिकत्व दुरूस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग येथे आज 11 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. अंदोलनकर्त्या महिलाच पत्रकार परिषद संबोधित करणार आहेत.
CAA-NRC Protest: नागरिकत्व दुरूस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग येथे आज 11 वाजता पत्रकार परिषद ; 30 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
कोरोना व्हायरस (Coronavirus). त्यामुळे जगभरातील शेकडो नागरिकांना हाकनाक गमवावा लागलेला जीव. त्यामुळे जगभरातील वैद्यकीय संशोधकांना मिळालेले आव्हान आणि निर्माण झालेली विचीत्र परिस्थिती. या सरगळ्यातून जगभरातील देश सध्या मार्गक्रमण करत आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोना व्हायरसमुळे चीनी आणि अप्रत्यक्षरित्या जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञ दावा करत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचे हे लोन कुठे घेऊन जाणार याबाबत अनेकांना चींता आहे. भारत आणि महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने हातपाय पसरु नयेत याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. या सर्व घटना घडामोडींव आपण लक्ष ठेऊन असणार आहोत.
दुसऱ्या बाजूला राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , राष्ट्रीय काँग्रेस (National Congress) प्रणित महाविकासआघाडी (Maha Vikas Ahadi) सरकार आता जोमाने कामाला लागले आहे. हे सरकार विविध निर्णय घेऊ लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या युती सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली आहे. या निर्णयांवर फेरविचार सुरु आहे. मुंबई मेट्रो 'आरे' कारशेड हासुद्धा स्थगिती मिळालेला एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. मुंबई मेट्रोचे कारशेड आरे येथे बनविण्यासाठी जागा सुनिश्चित केली होती. मात्र, प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास या कारणांमुळे पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीनेही हे कारशेड नियोजित जागेवरच व्हावे असा निर्वाळा दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो आणि आरे कारशेड याबाबत आज काय घडामोडी घडतात याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात आहे. प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 (Delhi Legislative Assembly election 2020) मध्ये सत्ताधारी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष असा सामना रंगत आहे. खास करुन इथे आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या राजकारणात आप तसा नवा पक्ष आहे. पाच सात वर्षांपलीकडे या पक्षाला राजकारणाचा अनुभव नाही. असे असतानाही अत्यंत नवख्या असलेल्या या पक्षाने या आधीच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला धूळ चारली होती. त्यामुळे निवडणूक प्रचारात कोण आघाडी घेतंय, काय आरोप प्रत्यारोप होतात याबाबत उत्सुकत आहे.
दरम्यान, वरील मुद्द्यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचा वेधही इथे घेतला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरातील घटना, घडामोडींचे ताजे आणि ठळक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा आणि आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या 7 जलाशयांत 95% पाणीसाठा
Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या जलाशयांत 95.50% पाणीसाठा, 24 तासांत साठ्यात घट
Water Levels in Mumbai Lakes: मुंबईच्या जलाशयांत ९५.८४ टक्के पाणीसाठा
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला सुवर्णपदक, चीनवर 1-0 ने मात