उत्तर प्रदेश आणि हरयाणा या दोन्ही राज्यांनी तान्हाजी (Tanhaji) चित्रपट करमुक्त केला आहे. यामुळे तान्हाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रातही (Maharashtra) हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी केलेले पत्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केले होते. यानंतर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तान्हाजी चित्रपट करमुक्त झाल्याची घोषणा करतील, असे ट्विट काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.
बाळासाहेब थोरात यांचे ट्वीट-
तान्हाजी चित्रपट करमुक्त कारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकार SGST चा परतावा देणार आहे, मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील.@PTI_News @ANI @sachin_inc
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 15, 2020