मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पारबंदर प्रकल्पाचे उद्घाटन, जाणून घ्या प्रोजेक्टची वैशिष्टे
पारबंदर पुल (Photo Credits-Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज मुंबईतील पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला.तर मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येणार आहे.

मुंबईचा विस्तार हा रायगड जिल्ह्यामधील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील चिर्ले गावापर्यंत होणार आहे. यामुळे रायगड मधील नाव्हा-शेव्हा बंदर आणि आलिबाग मुरबाड पर्यंत प्रवास करणे नागरिकांना सोईस्कर होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला ही जोडला जाणार असल्याने पुण्याहून मुंबईत प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.(मुंबई: नाना चौक ते लॅमिंटन रोडला जोडणारा फेररे उड्डाणपूल 16 जानेवारी मध्यरात्रीपासून पुढील सहा महिन्यांसाठी वाहतूकीसाठी बंद)

CM Uddhav Thackeray Tweet:

या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 कि.मी. असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे. एकूण 22 किमी लांबीचा पूल हा देशातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे, अरविंद सावंत आणि अजय चौधरी यांची उपस्थिती दिसून आली. पारबंदर या पुलाचे काम 2018 मध्ये सुरु करण्यात आले असून सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.