![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/Tilak-Bridge-Dadar--380x214.jpg)
Grant Road Bridge Shut: मुंबईतील नाना चौक (Nana Chowk) ते लॅमिंटन रोडला (Lamington Road) जोडणारा ब्रिटिशकालीन फेररे उड्डाणपूल 16 जानेवारी मध्यरात्री पासून वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप नागरिकांना पुढील सहा महिने सोसावा लागणार आहे. ब्रिटिशकालीन फेररे उड्डाणपूल तोडून या ठिकाणी नव्या पुलाची बांधणी करण्यात येणार आहे. मुंबईतील धोकादायक पुलांच्या यादीमध्ये या पुलाचे सुद्धा नाव होते. तर गेल्या एक महिन्यापूर्वी पासूनच या पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र हलक्या वाहनांना या उड्डाणपुलाचा वापर करता येणार आहे.
ब्रिटिशकालीन फेररे रोड 1921 मध्ये उभारण्यात आला होता. मात्र त्यानंतर सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून मुंबईतील धोकादायक पुलांची पुर्नबांधणी किंवा दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार आता नाना चौक ते लॅमिंटन रोडला जोडणारा फेररे रोड पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.(मुंबईतील 29 धोकादायक पूल महापालिका पाडणार, नागरिकांची कोंडी होणार)
यापूर्वी सैफी हॉस्पिटल येथील चर्नी रोड स्थानकाला जोडणारा पादचारी पूल धोकादायक असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यानंतर हा पूल नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हेतूने मुंबईतील धोकादायक पूल बंद करण्यात येत आहेत. महापालिकेकच्या अखत्यारित 344 पूल आहेत. त्यापैकी 304 पूलांचे ऑडिट करण्यात आले आहे. मात्र परीक्षणानुसार आता पर्यंत 29 पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तर धोकादायक पूलांमध्ये त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षितेतला प्राधान्य देत धोकादायक पूल पाडण्यात येणार असून त्याची पुर्नबांधणीचे काम करण्यात येणार आहे. त्याचसोबत नागरिकांना या कामाचा त्रास होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेकडून नियोजन करण्यात येणार आहे