Jammu-Kashmir: सोपोर मध्ये गोळीबार, जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु
Indian Army (Photo Credits-ANI)

Jammu-Kashmir:  जम्मू कश्मीर मधील बारामूला जिल्ह्यात सोपोर मध्ये गुरुवारी रात्री सुरु झालेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झाले आहेत. वारपोरा परिसराक गोळीबारानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते एक मुख्य कमांडर आणि अन्य दहशतवादी वारपोरा गावातील एका घरात होते. वारपोरा मध्ये दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आयजीपी कश्मीर यांनी असे म्हटले की, या गोळीबारात ठार झालेला दहशतवादी फयाज वार हा काही दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता. गेल्या वेळी त्याने उत्तर कश्मीर मध्ये दहशतवादी घटना घडवून आणल्या होत्या.

या दरम्यान, 22 आरआर, एसओजी सोपोर आणि सीआरपीएफ 179,177 आणि 92 बटालियन एक संयुक्त टीमने वारपोरा मध्ये घराघरांमध्ये तपास सुरु करण्यासह एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट्स सील केले. गोळीबारादरम्यान, जवानांनी दहशतवाद्यांना सरेंडर करण्यासाठी सांगितले. पण त्यांनी तसे न करता गोळीबार सुरु केला.(Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्य दलात नोकर भरती; 1.7 लाखापर्यंत मिळणार वेतन) 

यापूर्वी सुद्धा जम्मू-कश्मीर येथे शोपिया जिल्ह्यात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. तेव्हा लश्कर ए तैयबाचा मुख्य कमांडरसह दोन दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला होता. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी असे म्हटले की, दहशतवादी असल्याची माहिती मिळताच रविवारी दक्षिण कश्मीर मधील चेक सादिक खान परिसराला घेरले आणि सर्च ऑपरेशन सुरु केले होते.