File photo for representation only

Terrorist Attack In J& K: जम्मू आणि काश्मीर  (Jammu & Kashmir)  च्या शोपियॉं (Shopian) जिल्ह्यातील मोलु चित्रगाम (Molu Chitragam) या भागात आज दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरु झाली आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. याठिकाणी अजुनही चकमक चालु असुन पुढील अपडेट्स काहीच वेळात हाती येतील. दरम्यान यापुर्वी 17 ऑगस्ट रोजी सुद्धा जम्मू काश्मीर च्या बारामुल्ला (Baramulla)  या भागात दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर लगेचच दोन दिवसात पुन्हा एकदा काश्मीर खोर्‍यात हल्ला होणे हे चिंंताजनक आहे.

बारामुल्ला (Baramulla) या भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्याचे दोन जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद झाले होते. प्राप्त माहितीनुसार, एलईटीने हा हल्ला केला आहे. चेकपोस्टवर गोळीबारानंतर 3 दहशतवादी फरार झाले. बारामुल्ला, जम्मू-काश्मीर मध्ये 1 पोलिस आणि 2 सीआरपीएफ जवानांना आपला जीव गमावला होता.

ANI ट्विट

दरम्यान, केंद्र सरकारने जम्मु काश्मीर मध्ये 4G इंटरनेट सेवा 15 ऑगस्ट पासुन प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याची तयारी दाखवली होती, ही सेवा आंतरराष्ट्रीय बॉर्डर जवळ किंवा नियंत्रण रेषे जवळच्या भागात (Line of Control)सुरू केली जाणार नाही. सध्या सरकार जेथे दहशतवादी कारवायांचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी  सेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.  यावर अद्याप प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही मात्र तितक्यात अशा प्रकारचे हल्ले होणे हा चिंतेचा विषय ठरत आहे.