जम्मू-काश्मिर: सुरक्षादलाच्या जवानांकडून ISJK कमांडर इश्फाक सोफी याचा खात्मा
Indian Army (Photo Credits-File Photo)

जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) येथील शोपियान (Shopian) मध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ISJK या दहशतवादी संघटनेता कमांडर  इश्फाक अहमद सोफी (Ishfaq Ahmed Sophie) याचा खात्मा झाला आहे. काश्मिर मध्ये आयएसजेके संघटनेतील जाकीर मूसा याच्यासोबत  इश्फाक सोफी सुद्धा मुख्य कमांडर होता.  सोफीकडे भरपूर प्रमाणात शस्रसाठी आणि दारुगोळा सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलाला आशीपोरा येथे काही दहशतवादी लपून बसल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी सापळा रचून येथील परिसराला घेराव घातला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात चार दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी ऑपरेशन सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मिर येथील एसओजी टीम कार्य करत आहेत. दरम्यान आयएसजेकेचा अजून एक मोठा कमांडर जाकिर मूसा सुद्धा सुरक्षादलाच्या तावडीत सहजासहजी सापडणे थोडे कठीण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मूसा हा पंजाब येथे लपून बसला असल्याचा रिपोर्ट मिळाला होता.(आंध्रप्रदेश सीमेवर पाच नक्षलवादी ठार, 3 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश)

दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला काश्मिर शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. इमाम साहिब परिसरात सुरक्षादलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी अभियान राबवले होते. त्यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आले होते.