Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

UP: मेरठमध्ये भीषण अपघात, चालत्या कारला आग लागून ४ जणांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील मेरठमधील जानी पोलीस स्टेशन परिसरात गंगानहर ट्रॅक रोडवर रविवारी रात्री एका चालत्या कारला आग लागली. काही वेळातच गाडीतून धूर निघू लागला. यामुळे कारमधील चार जण जिवंत जळाले. आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना अपघाताची माहिती दिली,

बातम्या Shreya Varke | Jun 03, 2024 11:50 AM IST
A+
A-
Death PC PIXABAY

UP: उत्तर प्रदेशातील मेरठमधील जानी पोलीस स्टेशन परिसरात गंगानहर ट्रॅक रोडवर रविवारी रात्री एका चालत्या कारला आग लागली. काही वेळातच गाडीतून धूर निघू लागला. यामुळे कारमधील चार जण जिवंत जळाले. आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना अपघाताची माहिती दिली, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कमलेश बहादुर म्हणाले की, रविवारी रात्री 9:40 च्या सुमारास मेरठच्या ठाणे जानी परिसरातील गंगानगर ट्रॅक रोडवर एका कारला आग लागल्याची माहिती पीसीआरवर मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. हे देखील वाचा: UP: मेरठ में दुखद हादसा, चलती कार में आग लगने से 4 लोगों की जिंदा जलकर मौत

एएसपी म्हणाले की, अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी आग पूर्णपणे विझवली. आग विझवल्यानंतर कारमध्ये चार जणांचे मृतदेह सापडले. कारमध्ये तीन वृद्ध आणि एक लहान मूल असल्याचे दिसून येत आहे.

 एएसपी म्हणाले की, पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही कार दिल्लीतील प्रल्हादपूर बांगर गावात राहणारा ओमप्रकाश यांचा मुलगा सोहनपाल याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाचे म्हणणे आहे की, सिलिंडरमध्ये गळती किंवा स्फोट झाल्याने कारला आग लागल्याचा संशय आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.


Show Full Article Share Now