आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) सीमेवरील कोरापूट जिल्ह्यातील पाडूआ (Padua Forest) येथील जंगल परीसरात पाच माओवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हे माओवादी (Maoists) मारले गेले. प्राप्त माहितीनुसार या पाचमध्ये तीन महिला माओवाद्यांचाही समावेश आहे. कोरापूट एसपी कान्वर विशाल सिंह (Koraput SP Kanwar Vishal Singh) यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
केंद्रातील भाजप सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर दहशदवाद आणि नक्षलवादाचे कंबरडे मोडल्याचा दावा केला जात होता. प्रसारमाध्यमांनीही दहशतवाद आणि नक्षलवादी कारवाई करणाऱ्या गटांना मोठा फटका बसल्याचे वृत्त दिले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या नुकत्याच केलेल्या हल्ल्यात अनेक जवानांचा बळी गेला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमं आणि विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली होती. (हेही वाचा, गडचिरोली: सी-60 कमांडो पथकावर नक्षलवादी हल्ला, 3 जवान जखमी; मतदान संपल्यावर घडली घटना)
SP (Koraput) Kanwar Vishal Singh: Five maoists, including three women maoists, killed in an encounter in Padua Forest area of Koraput District near Andhra Pradesh border. #Odisha
— ANI (@ANI) May 8, 2019
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाही नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथे हल्ला केला होता. नक्षलवाद्यांनी हा हल्ला सी-60 कमांडो (C-60 Commando Squad) पथकावर हल्ला केला होता. यात पथकातील 3 जवान जखमी झाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारने मदतही केली आहे.