जम्मू-काश्मिर: पुंछ सेक्टर येथे आयईडी ब्लास्ट, एका जवानाचा मृत्यू तर 7 जण जखमी
Blast (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) मधील पुंछ सेक्टर (Poonch Sector) येथे आयईडी (IED) ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

कुलगाम येथे सुरु असलेल्या चकमकीत जवानांना दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर काही दहशतवादी या परिसरात लपून बसले असल्याची माहिती सूत्रांकडून जवानांना देण्यात आली होती. रात्री उशिरापासून दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु आहे.(जम्मू काश्मीर: कुलगाम येथील चकमकीत सुरक्षा रक्षकांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा)

मात्र गोपालपोरा परिसरात सुद्धा अधिक दहशतवादी लपून बसले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जवानांकडून सर्च ऑपरेशनद्वारे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.