जम्मू काश्मीर: कुलगाम येथील चकमकीत सुरक्षा रक्षकांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Two terrorists killed by security forces in Gopalpora area of Kulgam (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथील कुलगाम (Kulgam) परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काही दहशतवादी परिसरात लपल्याची माहिती मिळाल्याने जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. रात्री उशिरापासून कुलगामधील गोपालपोरामध्ये रात्री उशिरापासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु असून दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख उत्तर दिले आहे. तसंच लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

ANI ट्विट:

गेल्या दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. त्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. पुलवामा सोबत दक्षिण काश्मीर मधील अनंतनाग येथेही दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमच सुरु होती.