File image of Amarnath Yatra (Photo Credits: IANS)

पाकिस्तानी लष्काराचं समर्थन करणारे दहशदवादी अमरनाथ यात्रेवर  हल्ला करण्याचा कट आखत असल्याच्या माहितीनंतर आता भारतीय लष्कराकडून अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) थांबवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर मधील यात्री, पर्यटक, भाविकांना ताबडतोब माघारी बोलवण्यात आले आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरूंग आणि स्निपर रायफल आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र काही दिवसांपासून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोधमोहिम हाती घेतली होती. या शोध मोहिमेला यश मिळाल्याची माहिती लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन (Lt General KJS Dhillon) यांनी दिली आहे.

लष्कराने पत्रकारपरिषद घेतल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मिर मधील भाविक आणि पर्यटकांना पुन्हा माघारी पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमरनाथ यात्रा 4 ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

ANI Tweet

मागील आठवड्यापासून सुमारे 10,000 जवान दाखल करण्यात आले आहेत. तेव्हापासूनच या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जम्मू काश्मिरमध्ये अमेरिकन स्नायपर रायफल एम-24 जप्त करण्यात आली आहेत. काही ठिकाणी भूसुरुंग लावलेले आढळून आले आहेत,अशी माहिती देखील देण्यात आली आहे.  पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्यापही शोधमोहीम सुरू आहे, असेही ढिल्लोन यांनी सांगितले आहे.