Jammu and Kashmir: चारु सिन्हा करणार श्रीनगर मधील दहशतवादग्रस्त भागात CRPF चे नेतृत्व, ठरल्या या पोस्टवरील पहिल्या महिला IPS
Charu Sinha First Women CRPF Head At Srinagar (Photo Credits: ANI)

Who Is Charu Sinha : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधील दहशतवादग्रस्त भागांपैकी एक असलेल्या श्रीनगर सेक्टरच्या (Srinagar) केंद्रीय राखीव पोलिस दलात (CRPF) इन्स्पेक्टर जनरल (IG ) म्हणून पहिल्यांदाच महिला आयपीएस अधिकारीची नेमणूक करण्यात आली आहे. 1996 बॅचच्या तेलंगणा केडरचे आयपीएस अधिकारी चारू सिन्हा (Charu Sinha) आता महानिरीक्षकपदी सीआरपीएफसाठी श्रीनगर सेक्टरचे नेतृत्व करणार आहेत. यापूर्वीही त्यांंनी बिहार आयजी (Bihar IG)  म्हणून काम केले होते. सिन्हा यांंच्या नेतृत्वात विविध नक्षलविरोधी (Anti- Naxal Programmes) कारवाई करण्यात आल्या होत्या. आता आयजी जम्मू (Jammu IG) येथे त्यांंची बदली करण्यात आली.विद्यमान सीआरपीएफ महासंचालक ए. पी माहेश्वरी हे श्रीनगर सेक्टरचे प्रमुख होते यांंच्याकडुन चारु सिन्हा यांंच्यावर पदभार सोपावण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार श्रीनगर सेक्टर ब्रिन निशात, श्रीनगर (जेके) येथे आहे. 2005 पासून या कार्यालयाने काम सुरू केले. श्रीनगर सेक्टरचे जेके-बुडगाम, गांदरबल आणि श्रीनगर आणि केंद्रशासित प्रदेश लडाख असा या तीन जिल्ह्यांचा कार्यक्षेत्र आहे. जम्मू काश्मीर: बारामुल्ला येथे सैन्याच्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीवर ग्रेनेड फेकला, सहा नागरिक जखमी, पहा फोटो

दरम्यान, दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सामील होणारे हे क्षेत्र आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसह भारतीय सैन्यासह जवळून काम करत आहे.2005 पासुन या क्षेत्राच्या महानिरीक्षक पदावर कधीच महिला अधिकारी नेमल्या गेल्या नव्हत्याया क्षेत्रातील सर्व कामकाजाचे प्रमुख काम सिन्हा करणार आहेत. याशिवाय, जम्मू काश्मीर झोनमधील आयपीएस अधिकारी आणि वरिष्ठ केडर अधिकारी यांचीही सीआरपीएफमध्ये बदली करण्यात आली आहे.