Jalna crime: ( Photo credit- FILE IMAGE)

Jalna Crime:  जालना या जिल्हात दोन ग्रामसेवकांने लाच (Bribe) घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. दोन ग्रामसेंवकांनी दारूचे खंबे मागिलते आणि काही पैसांची मागणी केली. (ACB) एसीबीच्या पथकाने यांच्या विरुध्दात  कारवाई केली आहे. बांधकामाचा निधी काढून देण्यासाठी लागणाऱ्या परवानगी बीडीओंची सही लागत होती. त्यामुळे बीडीओंची (BDO) सही घेऊन देण्यासाठी सात हजार रूपये किंवा दारूचे दोन खंबे देण्याची मागणी या ग्रामसेवकांनी केली होती.

तक्रारदाराने  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) कार्यालयात तक्रार दिली आणि त्यानंतर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचेच्या बदल्यात दारुचे दोन खंबे देण्याची मागणी करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ग्रामसेवकांने काम पुर्ण करून घेण्यासाठी लाच घेतली. सिद्धार्थ कृष्णा घोडके ( 42) मांजरगाव तलुक्यातील बदनापूर येथील रहीवासी आहेत. पुष्पा महाजन अंबुलगे (40) उजैनपुरी येथील राहिवासी  आहे. असे कारवाई झालेल्या दोन्ही ग्रामसेवकांची नावं आहेत.

एसबीच्या पथकाने 20 जून रोजी बड्या चालाकीने या लाच घेण्याबाबत तपसणी केली. दरम्या सिध्दार्थ यांनी तुमचे काम रिक्वेस्ट करून आणून दिले असून, त्यांनी सुरुवातीला 11हजार रुपयांची मागणी केली. जमलेच नाही तर सहा सात हजार द्या अशी मागणी केली. दोन हजारांना मिळणारे ब्लॅक डॉगचे दोन खंबे मागितले. हे प्रकरण स्पष्ट झाल्यामुळे एसीबीच्या पथकाने सिद्धार्थ कृष्णा घोडके आणि पुष्पा अंबुलगे या दोन्ही ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल केला.