बिहार: तीन वर्षाच्या मुलाला छातीला कवटाळून धावत राहीली आई, नाहीच मिळाली रुग्णवाहिका; अखेर मृत्यू (Video)
(Photo Credit: twitter)

एका आई आपल्या तीन वर्षांच्या आजारी बाळाला घेऊन मदत मागत रस्त्याने धावत होती. तिला कोणाची मदत झाली नाही. रुग्णवाहिकाही उपलब्ध झाली नाही. अखेर त्या तान्हुल्याचा मृत्यू झाला. बिहार (Bihar) राज्यातील जहानाबाद (Jahanabad) जिल्ह्यातील ही घटना. आगोदरच गरीबी. दोन वेळच्या जोवनाची भ्रांत. अशा स्थिती कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि वाट्याला आलेला लॉकडाऊन (Lockdown). या महिलेने आपल्या बाळाला जहानाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. इथल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला घेऊन पटना (Patna) येथील पीएफएमएस रुग्णालयात जाण्याचे सूचवले.

महिला आणि तिच्या पतीसमोर प्रश्न होता रुग्णालयापर्यंत पोहोचायचे कसे? कडेवर छातीला कवटाळलेला बाळ तापाने फणफणत होता. महिला आणि तिचा पती हताश होतो. पटनापर्यंत जायचे तर ते अंतर थोडे नव्हते. रुग्णवाहिका वेळेत मिळाली तरच ते शक्य होते. त्यांनी रुग्णालयाकडे मागणी केली. मात्र, रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. अखेर ही महिला आणि तिच्या पतीने पायीच पटना गाठण्याचे ठरवले. तीन वर्षांचे तापाने फणफणनारे ते पोर घेऊन ती धावत राहिली रस्त्याने. अखेर जे व्हायचे तेच झाले. कडेवरच्या बाळाचा मृत्यू झाला. (हेही वाचा, गुजरात मध्ये लॉकडाउन असताना हजारो स्थलांतरित कामगारांकडून रस्त्यावर उतरत हिंसाचार; दगडफेक आणि जाळपोळ करत घातले थैमान)

ट्विटर पोस्ट (व्हिडिओ)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जहानाबादचे जिल्हाधिकारी नवीन कुमार यांनी आपल्याला या घटनेबाबत अद्याप माहिती नसल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचे आदेश आहेत. या आदेशात कोठे कसूर झाली असल्यास आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही नवीन कुमार यांनी म्हटले आहे.