Alcohol | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

केंद्र सरकारकडून तळीरामांना आनंदाची बातमी मिळू सकते. कारण येत्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये दारु स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या आहे त्यापेक्षा दारुचे भाव देशभरात स्वस्त होवू शकतात. तरी याबाबत २०२३ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार काय निर्णय गेत यावर सगळं आधारीत आहे. मद्य उत्पादकांची संघटना 'इंटरनॅशनल स्पिरिट्स अॅण्ड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया'ने (ISWAI) याबाबत केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. 'इंटरनॅशनल स्पिरिट्स अॅण्ड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया’ ने केंद्र सरकारकडे देशभरातील मद्यावरील कर कमी करण्याची मागणी केली आहे. तरी सरकारकडून या दरात कपात केल्या गेल्यास देशभरात आपसूकचं दारु स्वस्त होईल. याबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

 

तरी दारुवरील कर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकार तडकाफडकी घेवू शकत नाही तर येत्या वर्षिच्या म्हणजे २०२३ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने दारु वरील कर कपात केल्यास देशभरात दारुच्या किमती कमी होतील. असे झाल्यास तलीरामांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे. पण याबाबत कुठलही सुचक वक्तव्य अजून तरी केंद्र सरकारने केलेलं नाही. केवळ ISWAI च्या सीईओ नीता कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार दारुच्या किमतीत कपात होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (हे ही वाचा:- Goa Tourism: गोव्यात समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना दारू पिण्यास सक्त मनाई, गोवा सरकारकडून विशेष नियमावली जारी)

 

ISWAI च्या सीईओ नीता कपूर म्हणाल्या, दारुवरील जास्तीचा महागाई दर आणि कर यामुळे देशातील अल्कोहोल-वाईन इंडस्ट्री सध्या मोठ्या संकटात आहे. तरी आता दारुवरील करात कपात करणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारकडून मद्य कर कमी न केल्या गेल्यास ISWAI दारुच्या उत्पादन किंमतीत वाढ करेल.ज्यामुळे थेट दारु महाग होईल. तरी सरकारने मद्यकराबाबत लवकरचं निर्णय घेणं आवश्यक आहे.