Bomb In My Bag: केरळमधील कोची विमानतळावर (Cochin International Airport) एका प्रवाशाने बॉम्ब (Bomb) चा उल्लेख केल्यानंतर गोंधळ उडाला. तेथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी (CISF Officer) तातडीने कारवाई करत प्रवाशाला अटक (Arrest) केली आणि चौकशीनंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एअर इंडिया (Air India) च्या एआय 682 या विमानाने कोचीहून मुंबईला जात असताना ही घटना घडल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बचा उल्लेख करणाऱ्या प्रवाशाचे नाव मनोज कुमार असे आहे. 42 वर्षीय मनोज कुमार यांनी विमानतळावरील एक्स-रे बॅगेज इंस्पेक्शन सिस्टम (एक्सबीआयएस) चेकपॉईंटवर सीआयएसएफ अधिकाऱ्यांसमोर बॉम्बसंदर्भात टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर त्याला चौकशीसाठी थांबवण्यात आले आणि त्याची कसून तपासणी करण्यात आली. (हेही वाचा -Bomb Threat to Air India Flight: कोचीन विमानतळावरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; आरोपी अटकेत)
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रवासापूर्वी सुरक्षा तपासणी दरम्यान, प्रवासी मनोज कुमार यांनी सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले, 'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का?' मनोज कुमार यांच्या या प्रश्नाने सीआयएसएफ आणि विमानतळ सुरक्षा पथकाने तत्काळ कारवाई केली. (हेही वाचा - IndiGo Plane Bomb Threat Case: इंंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची फसवी धमकी दिल्याने 27 वर्षीय आरोपीला अटक )
बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने प्रवाशांच्या केबिन बॅगची कसून तपासणी केली. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान वेळेवर निघाले. आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर कुमार यांना पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.