Chandigarh Shocker: चंदीगड राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती भांडणातून सासऱ्यांने जावईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंदीगड जिल्हा न्यायालयात पंजाब पोलिसांचे निवृत्त सहाय्यक महानिरिक्षक मलविंदर सिंग सिद्धू यांनी त्यांच्या जावईची गोळी घालून हत्या केली. शनिवारी ही घटना कोर्टात घडली होती. या घटनेनंतर शहर हादरलं आहे. हेही वाचा- रिक्षा पार्किंगच्या मुद्यावरून मित्राची हत्या, आरोपीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत सिंग असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. तो भरातीय महसूल सेवा कृषी विभागात अधिकारी होता. दोन्ही कुटुंबात घरगुती वाद होता. कोर्टात मध्यस्थी करण्यात आलेले असताना त्यावेळी ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, हरप्रीत यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर ते रक्तबंबाळ अवस्थेत जमीनीवर कोसळले. पीडितेला गोळी लागताच, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चंडीगढ़ जिला कोर्ट में पंजाब पुलिस के पूर्व एआईजी ने अपने दामाद की गोली मारकर हत्या कर दी।
दोनों परिवारों के बीच घरेलू विवाद चल रहा था। इसी मामले में दोनों पक्ष शनिवार को चंडीगढ़ फैमिली कोर्ट में पहुंचे थे।
आरोपी की पहचान पूर्व एआईजी मलविंदर सिंह सिद्धू के तौर पर हुई है।… pic.twitter.com/NBQNXSTwiT
— Amit Pandey (@amitpandaynews) August 3, 2024
दोन्ही कुटुंबाचे गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होते. त्यावेळीस घटस्फोटासंबंधी त्यांना कोर्टात यावे लागले. यावेळीस सासऱ्याने बाथरुमला जाण्याचे बहाणे घेऊन आला. तेथे हरप्रीत सिंगवर गोळीबार केला. गोळीबारच्या घटनेच्या वकील देखील उपस्थित होते. गोळी लागताच, ते जमिनीवर कोसळले. उपस्थितांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर कोर्टात भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप आरोपीला ताब्यात घेतले नाही अशी माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी तपासणी करत आहे. कोर्टातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु आहे.