Thane Crime: रिक्षा पार्किंगच्या मुद्यावरून मित्राची हत्या, आरोपीला अटक
रिक्षा पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. ही घटना डोंबिवली येथील टीळक नगर येथे घडली.
Thane Crime: रिक्षा पार्किंगच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. ही घटना डोंबिवली येथील टीळक नगर येथे घडली. अश्विनी कांबळे (29) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मानपाडा येथील गोलावली गावात आई वडिल, पत्नी सोबत राहायचा. (हेही वाचा- रांचीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या, प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना)
मिळालेल्या माहितीनुसार, खंबाळपाडा परिसारत ऑटोच्या रांगेत वाहन उभे करण्यावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी सुनिल राठोज यांनी रागाच्या भरात कांबळे यांच्यावर हल्ला केला. डोक्यावर गंभीर जखम झाल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनास्थळी डोंबिवली येथील पोलिस दाखल झाले. त्यांनी कांबळे यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला टिळक नगर येथून अटक केले. त्याला न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. आरोपींने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने कांबळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2024 07:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

